वांद्र्यात इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग   

लाखोंचा माल जळून खाक 

मुंबई : वांद्रे येथील लिंकिंग रस्त्यावरील लिंक स्क्वेअर मॉलमधील 'क्रोमा' या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळे दुकानाचे बरेच नुकसान झाले. ही आग पहाटे चार वाजता लागल्याची माहिती मिळत आहे. 
 
लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत आहे. हे दुकान तळघरात आग आहे, तेथे आग लागून वरच्या मजल्यांवर पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत  कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग वाढली : झीशान सिद्दीकी

वांद्रे मॉलमध्ये आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी म्हणाले,''आम्ही पहाटे चार वाजल्यापासून येथे होतो. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे ही आग पसरली, हे मी स्पष्ट शब्दांत सांगतो. बेसमेंटमधील क्रोमाच्या शोरूममध्ये एक छोटीशी ठिणगी पडली. आम्ही अग्निशमन दलाला आणखी पाणी आणण्याची विनंती केली, पण त्यांच्याकडे उपकरणे नव्हती. त्यांच्याकडे उपकरणे असली तरी ती कशी वापरायची हे त्यांना माहितच नव्हते. हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सांगत होतो की, वर एक रेस्टॉरंट आणि सिलिंडर आहेत. पण, अग्निशमन विभागाने आमचे ऐकले नाही. सामान्य नागरिकाला माहिती आहे की, हा अग्निशमन दलाचा निष्काळजीपणा आहे, असे झीशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. 
 

Related Articles